
राळेगण सिद्धी – राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. राळेगणमधल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सुमारे अर्धा तास थोरातांनी अण्णांशी चर्चा केली. जनलोकपाल बिल संदर्भात अण्णांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी तसेच अण्णांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अण्णांची भेट घेतल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
