पाळीव कुत्र्याच्या विचारांचे भाषांतर करणारे उपकरण

आपला लाडका पाळीव कुत्रा नक्की काय विचार करतो हे समजून घेण्यासाठीचे उपकरण स्वीडीश शास्त्रज्ञांनी तयार केले असून अशा प्रकारचा जगातला हा पहिलाच हँहसेट असल्याचा दावाही केला आहे. हे हँडसेट कुत्र्याच्या मेंदूतील लहरी वाचू शकतात आणि त्याचे भाषांतर इंग्रजी शब्दात करू शकतात. नो मोअर उफ या नावाने तयार केलेला हा हँडसेट मालक आणि त्याचा कुत्रा यांच्यातील संवाद आणखी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल असाही संशोधकांचा दावा आहे.

यासाठी अत्याधुनिक मायक्रो कॉम्प्युटिंग तंत्रज्ञान इनसेफेलोग्राफी म्हणजे ईईजी वापरले गेले आहे. यामुळे कुत्र्याच्या विचारांच्या पॅटर्नचे विश्लेषण केले जाते आणि ते इंग्रजी शब्दात लाऊडस्पीकरवर ऐकता येते. कुत्रे भुकेले असेल, दमलेले असेल अथवा एक्साईट असेल तर त्यानुसार आय अॅम हंग्री, आय अॅम टायर्ड किंवा आय अॅम एक्सायटेड असे भाषांतर ऐकू येते. कुत्र्याने एखादा नवीन चेहरा पाहिला तर त्याच्या डोक्यात येणार्‍या विचारांचे भाषांतर हू आर यू असे होते असाही या संशोधकांचा दावा आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की मानवी मेंदूची कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी गेल्या दशकभर संशोधने सुरू आहेत मात्र माणसाचा चांगला मित्र असलेल्या कुत्र्याचे विचार समजून घेण्यासाठी मात्र प्रयत्न केले गेले नव्हते. नॉर्डिक सोसायटी अॅाफ इन्व्हेन्शन अँड डिस्कव्हरी तर्फे हे संशोधन केले गेले असून त्यांनी यापूर्वी टॅब्लेट चार्ज करणारी रॉकिग चेअर, माणसाबरोबर फिरू शकणारा दिवा, इनडोअर क्लाऊड जनरेटर अशी उपकरणेही तयार केली आहेत.

Leave a Comment