स्वीडनमध्ये महिलांना बरोबरच्या दर्जाने धास्तावले पुरूष

स्टॉकहोम- स्वीडनने जेंडर समानता कायदा राबविण्याचा प्रयोग सुरू केल्यापासून तेथील तमाम पुरूष धास्तावले आहेत. शाळा, नोकर्‍यांची ठिकाणे, विविध संस्था सगळीकडेच मुलगा मुलगी असा भेद करण्यास त्यामुळे बंदी येणार आहेच पण ही स्त्रीपुरूष समानता पुरूषांच्या मुळावरच येऊ पाहात असल्याचे तेथील तज्ञ सांगत आहेत.

या जेंडर समानतेमुळे महिलांना बरोबरीचे हक्क आणि बरोबरीचे प्रतिनिधित्व मिळणार असले तरी त्यामुळे नारीवाद हाच देशाचा धर्म बनू पाहात असल्याचा धोका निर्माण होत आहे आणि स्त्री पुरुष यांच्यातील अंतरामध्ये जे वैशिष्ठ होते तेच नाहिसे होत असल्याचे या तज्ञांचे म्हणणे आहे. हा प्रयोग धोकादायक असून निर्सगाची जैविक वास्तवता नाकारणे असा त्याचा अर्थ असल्याचे मतही व्यक्त होत आहे. स्वीडनमध्ये राबविल्या जात असलेल्या या प्रयोगामुळे लिंग ओळखू येऊ नये अशीच नांवे ठेवण्याचे बंधन घातले गेले असून मुलांच्या पालनपोषणासह अनेक कायदे पुरूषांच्या विरोधात असल्याचेही सांगितले जात आहे.

अर्थात जेंडर समानतेचा कायदा आणूनही अद्यापीही पुरूषांच्या तुलनेत महिलांना आजही १४ टक्के कमी वेतन दिले जाते. केवळ चार कंपन्यांमध्येच महिला प्रमुख म्हणून नेमल्या गेल्या आहेत आणि महिलांना तोंड द्यावे लागणार्‍या घरगुती हिंसाचार व अत्याचाराचे प्रमाणही अद्यापी गंभीर पातळीवरच आहे असेही दिसून आले आहे.

Leave a Comment