पुणे: विशिष्ट खाजगी साखर उद्योगांमध्ये राजकारण्यांना विशेष रस असून त्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी संपूर्ण देशाच्या साखर क्षेत्राला राजकारण्यांनी वेठीस धरले आहे, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘माझा पेपर’शी बोलताना केला. राजकारण्यांच्या आपमतलबी धोरणांमुळे शेतकरयांच्या उसाला योग्य भाव मिळत नाही आणि ग्राहकांना चढ्या दरात साखर खरेदी करण्याची पाळी येते; अशी टीकाही शेट्टी यांनी केली.
केवळ साखरेच्या उत्पादनातून उसाचे अर्थकारण करण्याचे दिवस आता मागे पडले असून सरकारने इथेनोल उत्पादन आणि वापर यासंबंधी व्यापक धोरण ठरविण्याची आवश्यकता प्रतिपादन करून शेट्टी म्हणाले की, साखरेबरोबरच इथेनोलचे उत्पादन केल्याने आणि त्याचा इंधन म्हणून वापर करण्यानेच उसाचे पीक किफायटशीर तरून शेतकार्याच्या पदरात योग्य मोबदला पडू शकतो. मात्रा देशातील मद्यसम्राट आणि क्रूड तेलाची आयात करणार्यांच्या दबावाला बळी पडून सरकार इथेनोलच्या वापराबाबतचे धोरण निश्चित करण्यास टाळाटाळ करीत आहे; असा आरोपही शेट्टी यांनी केला. इंधनात इथेनोल मिसळण्यास सुरुवात केल्याने क्रूड तेलाच्या आयातीत घट होऊन मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
साखरेचे उत्पादन मूल्य सुमारे २६ रुपये असताना ग्राहकांना त्यासाठी तब्बल ३४ रुपये मोजावे लागतात, याकडे लक्षा वेधून; देशात तयार होणार्या एकूण साखरेपैकी केवळ १८ ते २० टक्के साखर घरगुती उपयोगासाठी वापरली जाते. इतर सर्व साखर शीतपेय, मिठाई यांच्या उत्पादनासाठी वापरली जाते. त्यामुळे घरगुती वापरासाठी कमी दर आणि व्यवसायिक वापरासाठी अधिक अशी दुहेरी दरप्रणाली अमलात आणण्याची अथवा व्यावसायिक कारणासाठी साखरेची विक्री करताना त्यावर अधिक कर लावण्याची आवश्यकता शेट्टी यांनी व्यक्त केली. राजकारणीच साखरेचे धोरणकर्ते, दलाल आणि उत्पादक असल्याने ते शेतकर्यांना योग्य भाव ना देता आणि ग्राहकांना महाग साखर घेण्यास भाग पाडून दोघांचीही पिळवणूक करीत आहेत; असा आरोपही त्यांनी केला.