टी.व्ही.मुळे शुक्रबीजांची घट

गेल्या दोन वर्षात करण्यात आलेल्या एका संशोधनाने सारी मानव जात अस्वस्थ झाली आहे. कारण या संशोधनातून असे आढळले आहे की, जगातल्या पुरुषांची प्रजनन क्षमता घटत आहे. पुरुषांच्या शुक्रबीजांची संख्या घटत आहे. या संशोधनातून हे सत्य कळले खरे, परंतु या घटीच्या मागचे कारण काय? याचा काही शोध लागलेला नाही आणि ते कारणे शोधण्यासाठी जगातले अनेक संशोधक कामाला लागले आहेत. हार्वर्ड स्कूल ऑङ्ग पब्लिक हेल्थ या संस्थेने केलेल्या काही प्रयोगामध्ये असे दिसून आलेले आहे की, पुरुषांच्या शरीरातील शुक्रबीजांची संख्या आणि त्यांचा जोम घटण्यामागे त्यांच्या शारीरिक हालचाली कारणीभूत आहेत.

या हालचाली जितक्या कमी होतील तेवढ्या शुक्रबीजांच्या संख्येत घट होत राहील. या संबंधात त्यांनी जास्त वेळ टी.व्ही. पाहणार्‍या लोकांचा शोध घेतला. तेव्हा असे आढळले की, आठवड्यातून २० तासांपेक्षा अधिक वेळ टी.व्ही. समोर बसून राहणार्‍या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते. या उलट जे लोक टी.व्ही. पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी व्यायाम, खेळ, ङ्गिरणे आदी हालचाली करतात त्यांच्यात शुक्रांणूंची संख्या सामान्य आढळली. पुरुषांमध्ये दिसून येणारा हा दोष नव्या जीवनशैलीमुळेच निर्माण झाला आहे ही गोष्ट तर निर्विवादच आहे. परंतु जीवनशैली तल्या कोणत्या नव्या सवयी लोकांतल्या नेमक्या कोणत्या दोषास कारणीभूत आहेत याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे हार्वर्ड विद्यापीठातील संशोधक ऑड्रे गास्किन्स् यांनी म्हटले आहे.

त्यांनी या प्रयोगासाठी १८ ते २२ वर्षे वयोगटातील १८९ तरुणांची चाचणी घेतली आणि त्यांच्या सवयींचे निरीक्षण करण्यात आले. हे लोक किती वेळ टी.व्ही. पाहतात याची नोंद केली गेली. तेव्हा आठवड्यातून २० तासापेक्षा अधिक वेळ टी.व्ही. समोर बसणार्‍यांच्या शरीरात शुक्राणूंचे प्रमाण व्यायाम करणार्‍या लोकांच्या प्रमाणा पेक्षा ४४ टक्क्यांनी कमी आढळले आणि सतत टी.व्ही. समोर बसणार्‍या तरुणांच्या शुक्राणूंचे प्रमाण तर सामान्य पुरुषांपेक्षा ७३ टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले. एकंदरीत आजकालच्या लोकांना अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आणि त्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत ही गोष्ट त्यांच्या मुळाशी आलेली आहे.

Leave a Comment