नवी दिल्ली – लैंगिक छळाचा आरोप नाकारणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए.के.गांगुली यांच्यावर माजी प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने जोरदार टीका केली असून, त्यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.

चौकशीपासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी काही जण अफवा पसरवून या विषयाचे राजकरण करत आहेत. मी जे म्हटलय ते खोट असल्याचा कोणी दावा करत असेल तर, तो माझाच नाही तर सर्वोच्च न्यायालयाचाही अनादर आहे. विषयाची गंभीरता लक्षात घेऊन, मी पूर्ण जबाबदारीने कृती केली आहे. माझ्या स्वायत्ततेचा आदर राखा. मी योग्यवेळी योग्य पावले उचलीन असे या प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.
ए.के.गांगुली यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांना आठ पानी पत्र लिहून लैंगिकशोषणाचे आरोप फेटाळले. त्यानंतर या माजी प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने ब्लॉगलिहून गांगुलींवर टीका केली आहे. आपल्या निकालामुळे दुखावलेल्या काही जणांना प्रतिमा मलीन करण्यासाठी हे कुंभाड रचल्याचा दावा गांगुली यांनी केला होता.