अग्नि ३ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन विकास संघटन या संस्थेने विकसित केलेल्या अग्नि-३ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण काल ओदिशाच्या समुद्र किनार्‍यालगत असलेल्या व्हिलर बेटावरून यशस्वीरित्या करण्यात आले. या क्षेपणास्त्राचा पल्ला ३ हजार किलोमीटर एवढा असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. हे क्षेपणास्त्र दीड टन वजनाची अण्वस्त्रे सोबत घेऊन ३ हजार किलोमीटर अंतरावरल्या लक्ष्याचा भेद करू शकते.

काल झालेली अग्नि-३ क्षेपणास्त्राची चाचणी ही त्याच्या उपयोगाची दुसरी चाचणी होती. या चाचणीचे संचालन स्टॅटेजिक ङ्गोर्सेस कमांड या भारतीय लष्कराच्या विशेष विभागाने केले होते. काल या चाचणीत अग्नि-३ क्षेपणास्त्र हलत्या तळावरून करण्यात आले. या तळाचे नाव कॉम्प्लेक्स-४ असे होते. या चाचणीचे निरीक्षण विविध यंत्रणांकडून करण्यात आले.

अग्नि-३ क्षेपणास्त्र १७ मीटर लांबीचे असून त्याचा व्यास दोन मीटर एवढा आहे. प्रक्षेपणाच्यावेळी त्याच्यावरच्या पेलोडसहीत त्याचे वजन ५० टन एवढे होते. ते पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे.

Leave a Comment