श्रीदेवीच्या घरी आग – बेडरूम बेचिराख

मुंबई- बॉलिवूडमधील लोकप्रिय तारका श्रीदेवी हिच्या अंधेरीतील घराला आग लागून त्यात तिची बेडरूम बेचिराख झाली असल्याचे वृत्त आहे. श्रीदेवीचे मॅनेजर पंकज खरबंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार बेडरूममधील एसी त शॉर्ठसर्कीट झाल्याने ही आग लागली. त्यात बेडरूममधील सर्व वस्तू, श्रीदेवीने बनविलेली पेंटीग्ज तसेच तिचे कपडे बेचिराख झाले. आग लागली त्यावेळी श्रीदेवीचे कुटुंबिय घरातच होते.

मात्र आग लागताच श्रीदेवीने त्वरीत मेन स्वीच ऑफ केल्यामुळे आग पसरली नाही. अन्यथा संपूर्ण घर आगीने वेढले गेले असते. या वेळी प्रसंगावधान राखून तिने सासू व दोन्ही मुलींना सुरक्षितपणे घराबाहेर काढले  व अग्नीशामक दलाला फोन केला. अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यां नी तातडीने आग आटोक्यात आणली असेही समजते.