मोदीचा इतिहास कच्चा- नवाब मलिक

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी वांद्रा – कुर्ला संकुलात कॉंग्रेसवर टीका करताना महाराष्ट्राकचीही खिल्ली उडवली खरी, मात्र जोशपूर्ण भाषण करण्याच्या नादात त्यांनी पुन्हा आपला इतिहास कच्चा असल्याचे दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंबई हे गुजराती भाषेचे माहेरघर असल्याचे सांगत गुजराती भाषिकांच्या टाळ्य़ाही त्यांनी घेतल्या. गुजरात आणि महाराष्ट्र या स्वतंत्र राज्यांचा जन्म एकाच वेळी झाला. गुजरातकडे पाणी नाही, खनिज नाही अशावेळी प्रगती कशी साधणार, असे विचारले जात होते. इतक्या वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राने २६ मुख्यमंत्री दिले व गुजरातने केवळ १४ मुख्यमंत्री दिले, असे सांगत महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय व्यवस्थेला काँग्रेसचे व्होट बँकेचे राजकारण कारणीभूत असल्याचे ते म्हणाले होते

यावेळी पुढे नवाब मालिक बोलताना म्हणाले, ‘१९६० पासून इतक्या वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राने २६ मुख्यमंत्री दिले, मात्र राज्याचा विकास झाला नाही, असा टोला मोदींनी हाणला होता. मात्र मोदींचा हा आकडा चुकीचा असून महाराष्ट्रात आत्तापर्यंत फक्त १६ मुख्यमंत्री झाल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. रविवारी बीकेसी येथे झालेल्या महासभेत मोदींनी गुजरात व महाराष्ट्राची तुलना १ मे १९६0 पासून करताना गुजरातच्या विकासाचा पाढा वाचताना महाराष्ट्रावर जोरदार टीका केली.’

Leave a Comment