रिपब्लिकन पक्षाचे वरीष्ठ नेते आणि लुइसिआना प्रांताचे सध्याचे गर्व्हनर बॉबी जिंदाल यांनी २०१६ मध्ये होणार्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी जुळवाजुळव सुरू केली असून जिंदाल ही निवडणूक लढविणार आहेत असे अमेरिकेतील वरीष्ठ सिनेटर डेव्हीड ब्हिटर यांनी एका दूरवाहिनीला मुलाखत देताना सांगितले आहे.
जिंदाल यांची लुईसिआनाच्या गर्व्हनर पदाची ही दुसरी टर्म आहे आणि तिसरी टर्म त्यांना मिळू शकत नाही. डेव्हीड व्हिटर म्हणतात, जिंदाल हे अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाबद्दलही आदर आहे आणि त्यांची सर्व राजकीय मूल्ये व्हीटर यांना मान्य आहेत. जिंदाल यांची गर्व्हनरपदाची मुदत २०१५ मध्ये संपते आहे. मात्र व्हिटर हेही अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत आणि या संबंधीचा अंतिम निर्णय जानेवारीत घेतला जाणार आहे .