पोलिसाची गुंडागिरी, भरचौकात कामगार नेत्याला बेदम मारहाण

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक – एम्टा कोळसा खाणीतील कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कामगार नेत्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मारहाणीत प्रमोद मोहोड या कामगार नेत्याचा हात मोडला.

दरम्यान, कामात अडथळा आणल्याचा पोलिसांनी दावा केला. कर्नाटक एम्टा खासगी कोळसा खाणीबाबात धरणे आंदोलन सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक-एम्टा कोळसा खाणीतील कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कामगार नेत्याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून या खाणीत स्थानिक आणि परप्रांतीय कामगारांच्या मुद्यावर वाद सुरु आहे. गेल्या पाच दिवसांपासून यासाठी आंदोलन सुरु होते. मात्र गुरुवारी पोलिसांनी या आंदोलकांना अटक करून भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये आणले. प्रत्येक आंदोलनात होते तशी मजुरांनी इथेही नारेबाजी सुरु केली. अटक झाली म्हणून आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते प्रमोद मोहोड पोलिसांसोबत तावातावाणे बोलत होते. मात्र बोलता-बोलता वरोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांचा अचानक पारा चढला आणि त्यांनी मोहोड याना बेदम मारहाण केली.

पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत. साहेबांनीच दबंगगिरी दाखविली म्हटल्यावर कर्मचा-यांनीही हात धुवून घेतले. हात इतके धुतले कि कामगार नेते मोहोड सामान्य रुग्णालयात हात मोडल्याने दाखल आहेत. प्रमोद मोहोड यांना झालेल्या या मारहाणीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे याची तक्रार केली. मात्र पोलिसांनी प्रमोद मोहोड पोलिसांच्या कामात अडथळा आणत असल्यामुळे बळाचा वापर करण्यात आल्याचे सांगताहेत.

मात्र, चंद्रपूर राष्ट्रीय कोयला संघर्ष संघ अध्यक्ष प्रमोद मोहोड यांना पोलीस उप-अधीक्षक गणेश गावडे यांनी बेदम मारहाण केली. चौकशी करण्याऐवजी जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी याबाबत गावडे यांचे समर्थन केलेय. प्रमोद मोहोड यांना झालेल्या मारहाणीनंतर आंदोलन करणाºया जवळ-जवळ २०० कार्यकर्त्यांनी जामीन घेण्यास नकार आलाय. त्यामुळे त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.

Leave a Comment