टीम इंडिया आफ्रिकेतील पहिली कसोटी अनिर्णीत

जोहान्सबर्ग: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघामधली पहिली कसोटी अखेर अनिर्णीत राहिली. दोन्ही संघांनी या कसोटीत हातातोंडाशी आलेली विजयाची संधी घातली. टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या ४५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला पाचव्या दिवसाअखेर सात बाद ४५० धावांची मजल मारता आली. दोन्ही संघाना विजयासाठी समान संधी होती.

दक्षिण आफ्रिकेकडून प्रथम फलंदाजी करताना ड्यू प्लेसी आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांनी वैयक्तिक शतके झळकावली, पण त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २०२ धावांची भागीदारी रचून दक्षिण आफ्रिकेला विजयाचे स्वप्न दाखवले होते. पण अखेरच्या काही षटकांत टीम इंडियाच्याद गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजीला वेसण घातल्याने हे स्वप्न भंगले.

यजमानांना विजयासाठी १९ चेंडूंत अवघ्या १६ धावांचे आव्हान होते. पण प्लेसी धावचीत झाला आणि कसोटीला कलाटणी मिळाली. त्यानंतर स्टेन आणि फिलँडरने अनुक्रमे शमी आणि झहीरचे षटक निर्धाव खेळून काढले आणि टीम इंडियाने हा सामना अनिर्णीत राखण्यात यश संपादन केले.

Leave a Comment