‘कामसूत्र ३डी’ सिनेमाबद़ल चूकीचा अर्थ

आगामी काळात येत असलेल्या‍ अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या व ‘कामसूत्र ३डी’ या सिनेमाच्या पोस्टर आणि ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आले. पोस्टरमध्ये झिरझिरत साड्यांमधून अंगप्रदर्शन करणा-या शर्लिन चोप्राचा हा सिनेमा ब दर्जाचा म्हणजेच पॉर्न सिनेमा असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या सिनेमासंबंधी चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे दिग्दर्शक रुपेश पॉलने म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी अधिक बोलताना दिगदर्शक रुपेश पॉल म्हणाला, शर्लिन चोप्राला मुख्य भूमिकेत घेतल्याने गेल्याक काही दिवसांपासुन हा सिनेमा कमी दर्जाचे आहे म्हटले जात आहे. पण, आम्ही सध्या उपलब्ध असणा-या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिनेमा बनवला आहे. जगभरात या सिनेमाची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘क्रिश ३’ यांच्यापेक्षाही दुप्पट किंमतीत पूर्व विक्री करण्यात आली आहे.

८६व्या ऑस्कर पुरस्कारासाठी ‘कामसूत्र ३डी’ला बेस्ट मोशन पिक्चकर, ओरिजनल स्कोर आणि ओरिजनल साँग या तीन विभागांत नामांकने मिळाली आहेत. ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा १६ जानेवारी, २०१४ रोजी लाईव्ह केली जाणार आहे. तर पुरस्कार वितरण सोहळा मार्चमध्ये होणार आहे. त्यामुळे या सिनेमाला ऑस्कार पुरस्कार मिळणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.