कंगनाच्या ‘क्वीन’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

आगामी काळात येत असलेल्या व अभिनेत्री कंगना रणावतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘क्वीन’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. राणी या पात्राची भूमिका कंगनाने साकारली आहे. एक चुलबुली पण साध्या मुलीची भूमिका कंगनाने केली आहे. लवकरच येत असलेल्या ‘क्वीन’ सिनेमाकडून तिच्या खूप अपेक्षा आहेत.

‘क्वीन’ या सिनेमात लग्नानंतर एकटीच हनीमूनला गेलेल्या राणीचा प्रवास शुट करण्यात आला आहे. परदेशात हनीमूनला गेल्यावर समोर आलेल्या कठीण प्रसंगाना ती कशी सामोरे जाते हे यात पाहावयास मिळणार आहे. ‘काय पो छे’ आणि ‘शहीद’फेम राजकुमार यादव आणि सुपर मॉडेल लिजा हेडन यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

‘क्वीन’ या सिनेमाचे नुकतेच शुटिंग पूर्ण झाले आहे. विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’ पुढील वर्षी २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘क्वीन’ या सिनेमाकडे सध्यातरी सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.