झहीर खानने गाठला तीनशे विकेट्सचा टप्पा

जोहान्सबर्ग: टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज झहीर खानने कसोटी क्रिकेटमध्ये तीनशे विकेट्सचा टप्पा गाठला आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी झहीरने जॅक कॅलिसला माघारी धाडले आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपली तीनशेवी विकेट घेतली. सर्वाधिक विकेट्स काढणा-या टीम इंडियाच्या गोलंदाजांमध्ये झहीर सध्या चौथ्या स्थानावर आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात झहीरने चार विकेट्स घेऊन आफ्रिकेला २४४ धावांवर रोखण्यास मोठा वाटा उचलला होता. तर आता दुस-या डावातही त्याने जॅक कॅलिसचा महत्त्वाच्या फलंदाजाला बाद करुन मोठा अडथळा दूर केला.

त्याआधी मोहम्मद शमीने अल्विरो पीटरसनला बाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ७२ षटकांत ४ बाद २३१ अशी झाली आहे. टीम इंडियाने या सामन्यात यजमानांसमोर विजयासाठी ४५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सर्वाधिक विकेट्स काढणा-या टीम इंडियाच्यात गोलंदाजांमध्ये झहीर सध्या चौथ्या स्थानावर आहे.

Leave a Comment