जगातले पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण फ्रान्समध्ये!

लंडन – हृदय रुग्णाला किमान पाच वर्षांचे अधिकचे आयुष्य देऊ करणारे पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण फ्रान्समध्ये यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. एका ७५ वर्षीय फ्रेंच पुरुषाला हे कृत्रिम हृदय बसविण्यात आले. कारमॅट या फ्रेंच बायोमेडिकल कंपनीने या हृदयाचे डिझाइन तयार केले असून, लिथियम-आयन बॅटरीवर ते चालते. या बॅटरीचे संचालन शरीराच्या बाहेरून करता येते.

पॅरिस येथील जॉर्जेस पोम्पिडोऊ हॉस्पिटलमध्ये ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली, असे वृत्त ह्यद टेलिग्राफह्यने दिले आहे. या कृत्रिम हृदयासोबत बोव्हाइन ऊतींसह अनेक बायो-मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. शरीराने हे कृत्रिम हृदय स्वीकारावे, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. यापूर्वी कृत्रिम हृदयरोपणाचा पर्याय केवळ अल्पकाळासाठी वापरला जात होता. या शस्त्रक्रियेद्वारे बसविण्यात आलेले कृत्रिम हृदय रुग्णाला किमान पाच वर्षे वाढीव आयुष्य देईल, अशी अपेक्षा आहे. या हृदयाचे वजन एक किलोग्रॅमपेक्षा किंचित कमी आहे. तरीही ते सर्वसामान्य निरोगी मानवी हृदयाच्या तिप्पट आहे.

Leave a Comment