भ्रष्टाचारामुळे जनता हैराण – राहुल गांधी

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ङ्गेडरेशन ऑङ्ग चेंबर्स ऑङ्ग कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रिज (ङ्गिक्की) या संघटनेच्या सर्वसाधारण सभेसमोर बोलताना भ्रष्टाचार हा देशासमोरचा सर्वात गंभीर प्रश्‍न असल्याचे आणि भ्रष्टाचाराने सामान्य माणसाचे रक्त शोषले जात असल्याचे प्रतिपादन केले. देशाने भ्रष्टाचाराशी सामना केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी आपल्या कॉंग्रेस पक्षाने योजिलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. आपल्या पक्षाने भ्रष्टाचाराच्या विरोधात योजावयाच्या उपायांची एक चौकट तयार केली आहे, असे ते म्हणाले. भ्रष्ट लोक नेत्यांना शिक्षा सुनावली जाताच त्यांचे पद रद्द झाले पाहिजे, असा आग्रह आपल्या पक्षाने धरला असा दावा त्यांनी केला.

लोकपाल विधेयक मंजूर झाल्यामुळे तर भ्रष्टाचाराच्या विरोधातला लढा अधिकच प्रभावी झाला आहे असे सांगत असतानाच राहुल गांधी यांनी, आपल्या संपु आघाडी सरकारने भ्रष्टाचारविरोधी सहा विधेयके मंजूर केली आहेत असे सांगितले. भारतातले राजकीय कार्यकर्ते आणि नेते बदलत आहेत आणि त्यांची पारदर्शकता वाढत आहे, असे त्यांनी सांगितले.