नितेश राणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

मुंबई – ट्विटरवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे मराठी पत्रकारितेतील तरुण तेजपाल आहेत, अशी खोचक टिप्पणी केल्यामुळे ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्याविरोधात माहीम पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या मुळे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे आता ट्विटरवरच्या शाब्दिक चकमकीमुळे अडचणीत आले आहेत.

एका चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनी प्रेक्षकांचे आभार मानणारे ‘ट्विट’ ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना नितेश यांनी निखिल वागळे मराठी तेजपाल असल्याची टिप्पणी केली. हा प्रकार इथे थांबला नाही. ‘ब्रेकिंग न्युजपलीकडे जाऊन चांगला समाज घडवूया’, या वागळे यांच्या ट्विटवर नितेश यांनी ट्विटरवर पुन्हा खोचक विधान केले.

याप्रकरणी राणे यांच्याेविरोधात माहीम पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशीअंती भारतीय दंडविधानाच्या कलम ५०४, ५०६ आणि ६६ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६६ (ए) हे कलम पोलिस आयुक्तांच्या चौकशीनंतर लावण्यात येते. गेल्यार काही दिवसांपूर्वीच्‍ गोव्यातील टोल नाक्यावर केलेल्या राडेबाजीनंतर ट्विट प्रकरणामुळे नितेश पुन्हा गोत्यात येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment