हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

नागपूर- नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. या अधिवेशनात सात विधेयक मंजूर करण्यात आली असून तीन विधेयक अद्याप प्रलंबित असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. नागपूर अधिवेशनात विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे काम अनेकदा स्थगित करावे लागले.

अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनातील महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून मुंबईत होणार आहे.

Leave a Comment