
कोणतीही पूर्वसूचना न देता दक्षिण कोरियावर आम्ही कधीही हल्ला करू अशी धमकी उत्तर कोरियातील संरक्षण आयोगाने दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीला पाठविलेल्या फॅक्समध्ये देण्यात आली आहे. उत्तर कोरियातील गांज सांग थायक यांना फाशी दिल्याविरोधात मंगळवारी देशात विरोधकांनी जी निदर्शने केली त्यामुळे येथील संरक्षण विभागात नाराजी पसरली असल्याचे वृत्त आहे. या निदर्शनांची निदा करताना सैन्य विभागाने ही निदर्शन देशाला अपमानकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
