दाभोलकर हत्या- संशयितांची नार्को टेस्ट करणार

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यंक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार महिने उलटले असून अद्यापीही पोलिसांना हत्या करणार्‍यांसंबंधीचे धागेदोरे मिळालेले नाहीत. मात्र तपासास दिशा देणार्‍या संशयित अथवा आरोपींची नार्को टेस्ट केली जाईल असे पोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी सांगितले आहे.

२० ऑगस्ट रोजी येथील ओंकारेश्वर पुलावर दाभोलकर यांची दोन अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. चार महिने उलटूनही त्याचा कोणताही तपास पोलिसांना लागलेला नाही .या बाबत दाभोलकर कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहेच पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी काळे झेंडे दाखविले होते. त्यावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सिंघल बोलत होते. यापूर्वी ज्या आरोपींना संशयित म्हणून पकडले गेले होते त्यांना चौकशीनंतर पोलिसांनी सोडून दिले आहे.

Leave a Comment