आकाश चार मिळणार केवळ १५०० रूपयांत

नवी दिल्ली – शालेय विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी सहज परवडणारे संगणक देण्याची भारत सरकारची योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. केवळ २५०० रूपयांत हे संगणक दिले जात होते. मात्र आता त्यापुढचेही पाऊल सरकारने उचलले असून २०१४ सालात आकाश चार हे टॅब्लेट केवळ १४ पौंड म्हणजे १५०० रूपयांत शैक्षणिक क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिले जात असल्याचे टेलिकॉम मंत्री कपिल सिब्बल यांनी जाहीर केले आहे. दिल्लीतील एका संस्थेच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

सात इंची स्क्रीन असलेला हा टॅब्लेट स्क्रॅच रेझिस्टंट टच स्क्रीनसह मिळणार असून वायफाय, थ्रीजी, फोर जी कनेकटीव्हीटीही त्याला देण्यात आली आहे चार जीबीचे इंटरनल स्टोरेज युजरला मिळणार आहेच पण जादा मेमरी कार्डसह हे स्टोरेज ३२ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान मिळण्यासाठी शिक्षक, पालक आणि पुस्तके यांच्याबरोबरीनेच आधुनिक तंज्ञज्ञानही आवश्यक ठरते आहे हे लक्षात घेऊन हे टॅब्लेट स्वस्तात उपलब्ध केले जात असल्याचे सिब्बल म्हणाले.

पूर्वीच्या आकाशची निर्मिती यूकेच्या डाटाविंडने केली होती. मात्र नवीन आकाश च्या उत्पादनात अनेक उत्पादकांचा समावेश असेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment