ओबामा आमचेच, देवयानीवरील सर्व केसेस मागे घ्या’ – आठवले

मुंबई – आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देवयानीप्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाच पत्र लिहिलं आहे. “देवयानी खोब्रागडे मागासवर्गीय असल्यानेच ही कारवाई झाली असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामाही आमचेच आहेत. म्हणजेच ते सुद्धा ब्लॅक आहेत. त्यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करून, देवयानी खोब्रागडे यांच्यावरील सर्व केसेस मागे घ्याव्या, अशी मागणी पत्रात केल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी देवयानी प्रकरणावर आरपीआयची मत व्यक्त केली.

आठवले पुढे म्हणाले “ओबामा ब्लॅक आहेत. त्यांच्या समाजावरही अन्याय झाला आहे. तसंच भारतातही दलितांवर अन्याय झाला आहे. ओबामा तिथे असताना असा अन्याय होणं ही बाब गंभीर आहे. देवयानी खोब्रागडे प्रकरणात ओबामा न्याय देतील आणि अमेरिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना कामावरुन काढावं”. दरम्यान, आरपीआयनं देवयानी खोब्रागडे यांच्या अपमानाप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरपीआय कार्यकर्त्यांनी बांद्रा पश्चिमेतील पिझ्झा हट आणि डोमिनोजची तोडफोड केली आहे. राज्यभरातील अमेरिकन रेस्टॉरंट आणि मॅक्डोनाल्ड्स आऊटलेट बंद पाडण्याचा इशारा मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिला.

Leave a Comment