नुकसान भरपाईसाठी पुनर्विवाहीत पत्नीही पात्र: हायकोर्ट

मुंबई – पतीच्या अपघाती निधनानंतर मिळणाऱ्या नुकसान भरपाईपासून, पुनर्विवाह करणाऱ्या पत्नीला वंचित ठेवता येणार नाही. एका याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्वाळा दिला आहे. संदीप पुरंदरे यांचा 5 जुलै 2007 ला अपघाती मृत्यू झाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार संदीप यांच्या कुटुंबियांना 30 लाखांची नुकसान भरपाई मिळाली.

पण पुरंदरे यांच्या पत्नीनं पुनर्विवाह केल्यानं या नुकसान भरपाईपासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं. याविरोधात पुरंदरे यांच्या पत्नीनं उच्च न्यायालयात धाव घेतली. लहान मुलीचं शिक्षण आणि पालनपोषणासाठी या नुकसान भरपाईचा हिस्सा मिळणं गरजेचं असल्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. पुरंदरे यांच्या अपघाती मृत्यूची बाब लक्षात घेत या नुकसान भरपाईचा 60 टक्के वाटा संदीप यांच्या लहान मुलीला, 20 टक्के वाटा पत्नीला आणि उर्वरीत 20 टक्के वाटा आईला देण्यात यावा असे आदेश न्यायलयाने दिले आहेत.

Leave a Comment