देवयानी खोब्रागडे यांच्यावरील आरोप मागे घेण्यास नकार

वॉशिंग्टन – देवयानी खोब्रागडे जो पर्यंत संयुक्त राष्ट्र संघातील पदभार स्वीकारत नाहीत किंवा त्यांच्या नियुक्तीचे पत्र मिळत नाही तो पर्यंत त्यांना राजनैतिक सुरक्षा कवच मिळणार नाही. त्यामुळे अमेरिकन कायद्याप्रमाणे त्यांच्यावर रीतसर खटला चालवला जाईल असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मेरी हार्फ यांनी स्पष्ट केले.अमेरिकेतील भारताच्या उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांच्यावरील आरोप मागे घेण्यास अमेरिकेने स्पष्टपणे नकार दिला आहे.संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरुपी कार्यालयामध्ये देवयानी खोब्रागडे यांची बदली केली असली तरी, त्यांना लगेच राजनैतिक सुरक्षा कवच मिळणार नाही असे हार्फ यांनी सांगितले.

व्हीसा नियमांचे उल्लंघन आणि भारतीय नोकराचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या देवयानी खोब्रागडे यांना राजनैतिक सुरक्षा कवच मिळावे यासाठी भारताने त्यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या कायमस्वरुपी कार्यालयात बदली केली आहे. दूतावासासंबंधीच्या १९६३ च्या व्हिएन्ना करारानुसार सरकारी कामकाजाशी संबंधित गुन्ह्यामध्ये दूतावासातील अधिका-याला अटकेपासून संरक्षण मिळू शकते मात्र वयैक्तीक गुन्ह्यासांठी राजनैतिक संरक्षण मिळू शकत नाही असे हार्फ यांनी सांगितले.

गेल्या आठवडयात देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा नियमांचे उल्लंघन आणि भारतीय नोकराच्या आर्थिक शोषणाच्या आरोपावरुन अटक झाली होती नंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. अमेरिकेने या प्रकरणी खंत व्यक्त केली असली तरी, माफी मागितलेली नाही.

Leave a Comment