इंद्रा नूई यांच्या चेन्नईतल्या घरात चोरी

चन्नई – पेप्सी कोला या जगप्रसिद्ध कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्र नूई यांच्या चेन्नईतल्या घरात काल चोरी झाली आहे. त्या अमेरिकेत राहतात पण त्यांचे पैतृक घर अजूनही चेन्नईत आहे. सहा महिन्यांपूर्वी त्या भारतात आल्या होत्या पण तेव्हा त्यांचे घर सुरक्षित होते. सहा महिन्यांनंतर त्यांनी आपल्या घराला भेट दिली तेव्हा मात्र दरम्यान कधी तरी घरफोडी झाली असल्याचे त्यांना दिसून आले आणि त्यांना धक्का बसला.

दरम्यानच्या काळात कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून घरातल्या वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या आणि काही किंमती वस्तू पळवलेल्या दिसून आल्या. त्यांनी या चोरीची फिर्याद चेन्नईच्या पॉंडी बझार पोलीस ठाण्यावर नोंदली आहे.

या घरात इंद्रा नूई यांच्या मातोश्री राहतात पण सहा महिन्यांपूर्वी त्या अमेरिकेत रहायला गेल्या आहेत. आता त्या अमेरिकेत आहेत त्यामुळे नेमके काय चोरीला गेले आहे आणि त्याची किंमत किती हे त्यांंनाच माहीत आहे. पण हा माल काही लाखांचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांनी आईला अमेरिकेत नेल्यापासून घराची राखण करण्यासाठी एक रखवालदार नेमला होता पण तो गेल्या महिन्यापूर्वी बेपत्ता झालाा आहे.