आता भारतातही आवाजावर चालणारा कम्प्युटर!

मुंबई – आजच्या कम्युटरच्या जगात कोणाच्या डोक्यात कोणती कल्पना सुचेल याचा नेम नाही… महत्वाचं म्हणजे आजची पिढी फक्त कल्पना सुचव गप्प बसत नाहीङ्घ तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठीही प्रयत्न करतेङ्घ असाच एक आगळा-वेगळा प्रयत्न केलाय नवी मुंबईतल्या स्वप्नील देसाईनं… कम्प्युटरवर कमांड देण्यासाठी की-बोर्ड किंवा माऊसचा वापर करावा लागतो. पण जर तसं न करता फक्त तुमच्या आवाजावर, तुमच्या आज्ञेनुसार तुमचा कम्प्युटरवर तुम्हाला अपेक्षित काम करु लागला तर? होय अशाच एका भन्नाट सॉफ्टवेअरचा शोध लावलाय स्वप्नीलनं… ओपन गूगल… ह्यओपन माय अकाऊंटह्ण अशा नुसत्या शब्दात कमांड दिल्या तरी या सॉफ्टवेअरच्या मदतीनं तुम्ही तुमच्या कम्प्युटरकडून काम करुन घेऊ शकता… स्वप्नीलनं तयार केलेलं हे सॉफ्टवेअर इंग्रजी भाषेत कमांड घेतं… परदेशात अशा प्रकारची सॉफ्टवेअर्स आहेत पण भारतीयांच्या इंग्रजीत आणि परदेशातील इंग्रजी उच्चारात फरक असल्यानं नेमका हाच दोष त्यानं दूर केलाय… आता लोकल भाषेतही अशा प्रकारचं सॉफ्टवेअर तयार करण्याचं त्याचं स्वप्न आहे.

Leave a Comment