
माणसाचे मूड सतत बदलत असतात. कोणत्या वेळी कोणता मूड असेल हे कसे समजणार ? अनेक वेळा स्वतःलाही आपला मूड ओळखू येत नाही तर तो दुसर्यांना कसा समजणार ? संशोधकांच्या लक्षातही ही बाब आली असावी यामुळे त्यांनी मूड स्कॅन करणारे अॅप तयार केले आहे. हे अनोखे अॅप केवळ मनोरंजनासाठी आहे. मूड स्कॅन करून त्याचा रिझल्ट देण्यासाठी यात अनेक रंगाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक रंग वेगळा मूड दर्शविणार आहे.