ब्रेकअप मागे अर्जुन रामपालचा हात नाही-सुझान

मुंबई: काही दिवसापूवीच अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान यांच्यातले १७ वर्षांचं नातं संपुष्टात आले आहे. मात्र याबाबत हृतिकने याबाबत ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद साधला असला तरीही पत्नी सुझान काहीही बोलण्याच्या मूडमध्ये नाही. या ब्रेकअपच्या मागे अर्जुन रामपालचा हात नाही असे मात्र यावेळी सुझानने स्पष्ट केले.

यावेळी पुढे बोलतान सुझान म्हणाली, ब्रेकअप हा आमचा वैयक्तिक प्रश्न असून याबाबत काहीही बोलू इच्छित नाही, असे सुझानने म्हटले आहे. तसेच या रिलेशनच्या ब्रेकअप मागे अभिनेता अर्जुन रामपाल असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आमच्या निर्णयामागे कोणही नसल्याचे तिने स्पस्त केले.

मात्र सुझानने हा आमच्या दोघांचा निर्णय असून यामागे कोणाचाही हात नसल्याचे म्हटले आहे. तसंच अभिनेता अर्जुन हा माझा आणि हृतिकचा चांगला मित्र असल्याचेही यावेळी बोलताना सुझानने स्पष्ट केले आहे.