मुंबई – गायिका आणि मॉडेल सोफिया हयात हिनं पोलिसांत तक्रार दाखल केल्याने अभिनेता अरमान कोहलीला अटक झाली होती. आता अरमानने पुन्हाी एकदा ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री घेतली आहे. अरमानच्याा येण्याने तनिषाचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला आहे.

‘बिग बॉस’मधील घरात दाखल झाल्यानंतर संग्राम आणि अँन्डी अरमानचे हसतमुखाने आणि आनंदाने स्वागत केले. तनिषाचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला आहे. तनिषाला पाहिल्याबरोबर अरमाननं तनिषाला मिठी मारून उचलून घेतलं. अरमानची आतूरतेनं वाट पाहणाया तनिषानंही अरमानला किस करून आपण त्याला किती मिस केलं हे दाखवून दिले आहे.
त्यानंतर अरमान आणि तनिषा बोलत असताना अरमाननं आपल्या आई-वडिलांनी तनिषासाठी दिलेली प्रतिक्रिया तिच्याजवळ व्यक्त केली.माझे वडिल संपूर्ण रात्रभर मी पोलीस स्टेशनमधून बाहेर निघावं म्हणून वाट पाहत बसले होते. त्यांनी पहिल्यांदाच मला आय लव्ह यू म्हटलं’ असंदेखील यावेळी अरमाननं म्हटलं. सोफियानं निर्माण केलेल्या प्रकरणाबद्दल यापुढे या घरात आपल्याला काहीही बोलायचं नसल्याचंही अरमाननं यावेळी म्हटले.