पाण्याबाबत सावध रहा

आता पाण्याबाबत आपण पुरेसे सावध झालो आहोत आणि पाण्यातून शरीरात पसरणार्‍या आजारांबाबत आपल्याला पुरेशी माहिती झाली आहे. आपल्याला नगरपालिका किंवा महानगरपालिका पुरवतात ते पाणी किती अशुद्ध असते याची जाणीव झाल्याने घरोघर ङ्गिल्टरचा वापरही वाढत चालला आहे पण काही वेळा घरात कटाक्षाने ङ्गिल्टरचे पाणी पिले जात असतानाही घरातल्या एखाद्या सदस्याच्या पोटात कळ येते. काही तरी गडबड होते. तेव्हा असे का व्हावे याचा बोध होत नाही. आपण ङ्गिल्टरवर अवलंबून असतो आणि ङ्गिल्टरच्या पाण्यामुळे आपली आजारांतून सुटका होणार अशी आपली खात्री असते. म्हणून आपण आजाराची कारणे अन्यत्र शोधायला लागतो.

ती सापडत नाहीत कारण आपण आपला ङ्गिल्टर तर आजारी पडलेला नाही ना याची खात्री करून घेतलेली नसते. गूढ आजाराचे कारण तिथे लपलेले असते. ङ्गिल्टर बाबत दोन गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. मुळात पहिली गोष्ट म्हणजे सगळेच ङ्गिल्टर सारखे नसतात. त्यांचे अनेक प्रकार असतात आणि त्या प्रत्येकाची क्षमता निरनिराळी असते. प्रत्येक ङ्गिल्टर सगळ्याच प्रकाराचे पाणी शुद्ध करू शकत नसते. ङ्गिल्टर खरेदी करताना तो कोणत्या प्रकारचे पाणी आणि किती शुद्ध करू शकतो याची माहिती करून घेतली पाहिजे. आपल्याला जे पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरावयाचे आहे ते पाणी कसले आहे आणि त्यासाठी आपण घेत असलेला ङ्गिल्टर योग्य आहे का हे विचारून पाहिले पाहिजे.

पाण्यातली अशुद्धता दाखवला जाणारा एक दर्शक असतो. आपल्याला ङ्गिल्टरचा डेमो देणार्‍या विक्रेत्याकडे तो असला पाहिजे आणि त्याने आपले पाणी किती अशुद्ध आहे हे त्या दर्शकाच्या द्वारे आपल्याला दाखवले पाहिजे. ते पाणी ङ्गिल्टर केल्यानंतर किती शुद्ध झाले आहे हेही नंतर दर्शकाच्या साह्याने कळते. एकदा ङ्गिल्टर घेतला म्हणजे काम भागत नाही. तो अनेक वर्षे विनातक्रार काम करीतच राहील असे नसते. तेव्हा त्याची मरम्मत काय करावी लागेल याची माहिती करून घेतली पाहिजे आणि त्या त्या वेळी ती केली पाहिजे. ङ्गिल्टर बिघडला तरी तो तसाच ठेवला तर पाणी शुद्ध मिळू शकत नाही. तेव्हा पोटात गडबड झाली की पोटाबरोबरच ङ्गिल्टरच्याही डॉक्टरला दाखवले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment