काळसेकर, जावेद अख्तर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली- मराठीतील ज्येष्ठ कवी आणि प्रसिद्ध लेखक सतीश काळसेकर आणि हिंदीतील प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. काळसेकर यांच्या ह्यवाचणा-याची रोजनिशीह्ण या निबंध संग्रहाला तर अख्तर यांना ह्यलाव्हाह्ण या उर्दू काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

यंदा आठ कवीता संग्रह, चार निबंध संग्रह, तीन कांदब-या, प्रवासवर्णन आणि लघुकथा संग्रह यांना प्रत्येकी दोन तर आत्मकथा, नाटक आणि आठवणी या साहित्य प्रकारांना पुरस्कार मिळाले आहेत. यंदा २२ लेखक आणि कवींना पुरस्कार जाहीर झाले आहे. या पुरस्कारांचे वितरण ११ मार्च २०१४ रोजी नवी दिल्लीत होणार आहे. स्मानचिन्ह, शाल एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

काळसेकर यांच्याकडे मागोवा, तात्पर्य, लोकवाड्मय, फक्त, तापसी, चक्रवर्ती आणि सद्या वाड्मयवृत्त या नियकतालीकाच्या संपादकीय जबाबदा-या आहेत. १९९८ ते २००२ या काळात साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सभासद होते. तसेच महाराष्ट्र फाउण्डेशन (अमेरिका)च्या भारतीय पुरस्कार निवड समितीचे काळसेकर १९९४ ते २००३ या काळात सभासद होते तर २००८ पर्यंत निवड समितीचे निमंत्रक होते.

भारतीय आणि विदेषी भाषांतील कवींच्या कवितांसह त्यांनी महाश्वेता देवी आणि रस्किन बाँड यांच्या कथांचा मराठी अनुवाद केला आहे. याआधी काळसेकर यांना सोविएत लॅण्ड नेहरु पारितोषिक (१९७७), लालजी पेंडसे पुरस्कार (१९९७), बहिणाबाई पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद (१९९८), महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९९), कैफी आजमी पुरस्कार (२००६), महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार (२०११) आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार (२०१०-११) आदी पुरस्कार मिळाले आहेत.