
मुंबई- मामा-भाच्यातील नातं काही वेगळंच असतं. आपल्या भाच्याच्या भल्यासाठी मामा सहसा झटताना दिसतो. बॉलीवूडचा स्टांर असलेल्याा इम्रानची कारकिर्दीसाठी अमिर खान सध्याो सरसावरला आहे.

मुंबई- मामा-भाच्यातील नातं काही वेगळंच असतं. आपल्या भाच्याच्या भल्यासाठी मामा सहसा झटताना दिसतो. बॉलीवूडचा स्टांर असलेल्याा इम्रानची कारकिर्दीसाठी अमिर खान सध्याो सरसावरला आहे.
आता आपला परफेक्टशनिस्ट असलेला आमिर खानच घ्या ना, त्याचा भाचा इम्रान खान मागील काही वर्षापासून चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडत आहे. तो विनाकारण लुडबूड करत आहे, असा आरोपही काही जण करतात. त्याने केवळ आमिरचा भाचा या एकाच गुणावर आतापर्यंत चांगल्या चांगल्या भूमिका त्याही अगदी आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर मिळवल्या.
मोठ्या बॅनरच्या निर्मात्यांनीही त्याला आपल्या चित्रपटांसाठी घेतले. मात्र ज्याला अभिनयच येत नाही, त्याला अभिनेता म्हणून कारकीर्द घडवणं थोड अवघडच नाही का? बरं या बुवाला नाचताही येत नाही. आता आमिरच्या केवळ नावावर किती दिवस चालणार, आता खुद्द आमिरनच या कामात पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. त्याने आपल्या भाच्याच्या कारकिर्दीसाठी काय करता येईल, याचा विचार सुरू केला आहे. आता आमिर त्याच्या निर्मात्यांशी बोलणार आहे. त्यात त्याच्या संहितेचे वाचन करून इम्रानसाठी कोणत्या संहिता चांगल्या आहेत, हे देखील तो ठरवणार आहे. या टप्प्यावर कोणते चित्रपट करायचे व कोणते नाही, याच बरोबर कोणाबरोबर काम करायचे हे देखील तो त्याला सांगणार आहे.