
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी याच्यावर बनत असलेल्या चित्रपटात तरूण मोदींच्या भूमिकेसाठी विवेक ओबेरायला विचारण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मोदींची प्रमुख भूमिका गुणी अभिनेता परेश रावल साकारणार आहे.या चित्रपटाची निर्मिती अमेरिका स्थित मितेश पटेल हे करत आहेत.
