दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची कसोटी

जोहान्सबर्ग – जोहान्सबर्ग येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याउत टीम इंडियाची बुधवारपासून कसोटी लागणार आहे. वनडे मालिकेतील अपयशानंतर आता कसोटी मालिका टीम इंढियाला जिंकावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिका आयसीसीच्या जागतिक कसोटी रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. या संघासोबत धोनी आणि कंपनी दोन हात करावे लागणार आहेत.
द. आफ्रिका संघ घरच्या मैदानावर खेळणार असल्या्ने विजयासाठी फेव्हरिट समजला जातो आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाची ही पहिलीच कसोटी. या कसोटीत सचिन तेंडुलकरच्या चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजीस येणार याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची शक्यता आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर राजासारखा खेळणारा विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर म्हणावा तसा स्थिरावलेला नाही. टीम इंडियादेखील जवळपास दोन वर्षांनंतर परदेशी खेळपट्टीवर कसोटी खेळणार असल्याने कोहलीसह सगळ्याच फलंदाजांची ‘कसोटी’ लागेल यात शंका नाही. घरच्या मैदानावरील गेल्या बारा कसोटींपैकी नऊ कसोटी भारताने जिंकल्या आहेत, तर दोन कसोटींमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. एक कसोटी अनिर्णित राहिली.

टीम इंडियात सचिनबरोबरच राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंची उपस्थिती नाही. त्यात वीरेंदर सेहवाग, गौतम गंभीर आणि हरभजनसिंग यांच्यासारख्या खेळाडूंनी फॉर्म अभावी संघातील स्थान गमावले आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कसोटी मालिकेत अन् खासकरुन द. आफ्रिकेच्या खेळपट्टीवर खेळताना कोहलीने आपल्या आक्रमक बाण्याला संयमाची जोड देणे आवश्यक आहे.

Leave a Comment