ठाण्यात आरमानची भेट घेतली सलमानने

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या सोफियाने अरमानची पोलिसांत तक्रार केल्यानंतर अरमानला पोलिसांनी अटक केली. त्यातला एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागली. त्यासला अटक करण्यात आल्याेची माहिती घरातल्या इतर स्पर्धकांना नव्हती. पण, यावेळी अरमानला मदत करण्यासाठी ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खान सर्वात पुढे सरसावला आहे.

‘बिग बॉस’ मध्ये सहभागी झालेली ब्रिटिश गायिका – अभिनेत्री सोफिया हयात हिने शो दरम्यान अरमानने तिच्यावर कथित स्वरुपात हल्ला करण्याची तक्रार पोलिसांमध्य दाखल झाली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यारनंतर सोमवारी रात्री लोणावळा पोलिसांनी ‘अरमान’ला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढून अटक केली होती. पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी केली गेली. सध्या पोलीस या प्रकरणात बीग बॉसच्या घरातील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, अरमानला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच सलमान खानने तात्काळ अरमानशी संपर्क साधला आणि त्याला धीर दिला. अचानक कोसळलेल्या या संकटाने अरमान चांगलाच तापला होता. सलमानने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. सोफियाने नोंदवलेल्या तक्रारीवर कायदेशीर पद्धतीनेच जाण्याचा सल्ला त्याने अरमानला दिला. एवढंच नाही तर, तू लवकरच बिग बॉसच्या घरात परतशील, असे म्हणत सलमानने अरमानला शांत केले. सलमानेनेहा दिलासा दिल्यारने आरमान काहीसा शांत झाला.