जगात सर्वात जलद बोलणारी महिला

महिला बोलण्यात नेहमीच अग्रेसर असतात असा जगाचा समज आहे. बोलण्यात महिलांचा हात कुणी धरू शकत नाही हे अवघ्या पुरूष जमातीने कधीच मान्य केले आहे. अर्थात जास्त बोलणे आणि जलद बोलणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.मात्र जलद बोलण्याचा विश्वविक्रमही एका महिलेच्याच नावावर असून तिचे नांव आहे फ्रॅन कापो. ही मुलगी सेकंदात तब्बल ११ शब्द बोलते. या वेगामुळे तिने गिनीज बुकमध्ये नांव कोरले आहे.

कोपा सांगते की प्राथमिक शाळेतच तिने हे कौशल्य आत्मसात केले आहे. वर्गात उत्तरे देताना ती अतिशय जलद विचार करून सर्वात आधी आपले उत्तर यावे यासाठी वेगाने बोलत असे. त्याची इतकी सवय झाली की आजही ती अतिशय वेगाने बोलते. परिणामी पार्टी समारंभात तिच्या शेजारी बसण्यास कुणी तयार नसते. कोपाने आजपर्यंत ४५० टिव्ही शेा मध्ये सहभाग घेतला आहे शिवाय अन्य चार वर्ल्ड रेकॉर्ड ही तिच्या नावावर जमा आहेत.

किलिमांजारो या सर्वाधिक उंचीच्या पर्वतावर पुस्तकावर सही करण्याचे तसेच समुद्रात सर्वात खोलवर जाऊन पुस्तकावर सही करण्याचे रेकॉर्ड तिच्याच नावावर असून समुद्रात तिने टायटानिक रेक साईटवर जाऊन पुस्तकावर सही केली आहे.

Leave a Comment