केस का गळतात ?

केस गळायला लागले की चिंता वाटायला लागते कारण केस गळणे आणि टक्कल पडणे हे वार्ध्यक्याचे लक्षण असते. टक्कल पडायला लागले की आपण आता म्हातारे होत चाललो अशी भावना निर्माण होते. तसे तर आपण वयाने म्हातारे होतच असतो पण तरीही डोक्यावर तारुण्यातल्या सारखे भरघोस केस असावेत असे सर्वांनाच मनोमन वाटत असते. डोक्यावरचे केस केवळ वार्धक्यामुळेच गळत असतात असे नाही. त्याला इरतही काही कारणे असतात. ती अशी.

१) तणाव – तणावाने अनेक आजार ओढवले जातात. त्यात केस गळणे हा एक आजार आहे. कारण केसांचे जतन होणे हे निरामयतेवर अवलंबून आहे.

२) आनुवंशिकता – अनेकांना टक्कलाची देणगी वारशात मिळालेली असते. ज्याच्या वडलांना टक्कल असते त्याला टक्कल पडते. अर्थात केस गळून टक्कल पडण्याच्या या कारणावर काहीही इलाज नाही.

३) हेअर स्टयलिंग – हेअर स्टाईल करण्यासाठी काही साधने वापरली जातात पण, त्यातल्या काही साधनांचा केसांवर विपरीत परिणाम होत असतो. काही लोक केस धूतात आणि ते नंतर विजेवर चालणार्‍या हॉट ब्लोअरने वाळवतात. त्यामुळे केस गळण्याची शक्यता असते. काही वेळा केस कुरळे करण्यासाठी काही साधने वापरली जातात. त्या कामात केसांशी झटापट केली जाते आणि काही केस मुळासकट उपटले जातात.

४) अनेक महिलांचे केस छान असतात पण एखादी प्रसूती झाली की तिच्यामुळे शरीरात होणार्‍या हार्मोनच्या बदलाने केस जातात. रजो निवृत्तीच्या काळातले हार्मोनचे बदल आणि थायरॉईडचा असमतोल हाही केसाच्या गळण्यास कारणीभूत ठरत असतो.

५) शांपू, कंडीशनर, डाय यांंचा वापर करणारांच्या केसांवर त्यातील रसायनांचा घातक परिणाम होत असतो. आपण खोबरेल तेल हे नैसर्गिक असल्याचे मानतो पण आजकाल त्यातही अनेक प्रकारची रसायने मिसळली जायला लागली आहेत. ती केसांच्या गळण्याला कारणीभूत ठरतात. ६) जंक ङ्गुड अधिक प्रमाणात खाण्यानेही केस गळू शकतात.७) हवामानातले काही बदल. एसीत बसणे आणि लगेच तापत्या उन्हात ङ्गिरणे या त्वरित बदलानेही केस गळतात. ८) अन्य काही औषधेही केसांवर परिणाम करीत असतात. शांत झोप न लागणार्‍यांचेही केस गळतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment