‘ऑस्कर पुरस्कारही फिक्स असतात’- नासिरुद्दीन शाह

मुंबई – ‘ऑस्कर पुरस्कारदेखील कोणत्याही सामान्य पान मसाला चित्रपट पुरस्कारांसारखे फिक्स असतात. याच्या मागे धावणं व्यर्थ आहे,’ असं ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. एरव्ही मीडियाशी कमी बोलणारे नासिरुद्दीन शाह त्यांच्या ‘डेढ इश्किया’च्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात दिसले. यावेळी ‘डेढ इश्किया’शिवाय त्यांनी बॉलिवूड आणि भारतीय सिनेमावर भाष्य केलं.

दिग्दर्शकांची ऑस्कर जिंकण्याची धडपड मला हास्यास्पद वाटते, कारण मला वाटतं की आपल्याला कधीच ऑस्कर मिळणार नाही, त्यामुळे याची काळजी सोडून आपण बनवत असलेले चित्रपटच बनवावेत, असं नासिरुद्दीन म्हणाले अनेक दिग्दर्शक ऑस्कर पुरस्कारांच्या मागे धावतात, याचं मला आश्चर्य वाटतं, असं नासिरुद्दी यांनी म्हटलं आहे. नासिरुद्दीन म्हणाले की, आपण हिंदी चित्रपट जास्त पाहत नाही. पण मागील काही वर्षांत ‘देव डी’, ‘देल्ली बेल्ली’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आणि राजकुमार हिरानीचे चित्रपट आवडले आहेत. याशिवाय इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मनोज वाजपेयी हे आवडते अभिनेते असल्याचंही ते म्हणाले.

Leave a Comment