‘आप’ बॉलीवूडमधील कलाकारांना उमेदवारी देणार

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या. दिल्लील विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आता लोकसभेसाठीही आम आदमी पार्टी मैदानात उतरणार आहे. त्यापची तयारी त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘आप’ बॉलीवूडमधील कलाकारांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहे. बॉलीवूडमधील प्रीती झिंटा आणि अनुपम खेर यांच्या नावांची चर्चा जोरात आहे. त्या शिवाय आणखी काही बॉलीवूडमधील नावे पुढे येत आहेत.

आगामी काळात ‘आप’चे नेते बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या संपर्क वाढविण्याेचा प्रयत्नय करणार आहेत. मराठी कलाकारांनाही पार्टीने संपर्क केला असल्याचे कळते. संगीतकार विशालने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’साठी प्रचार केला होता. त्यामुळे त्यालाही उमेदवारी मिळू शकते. तसेच पश्चि म बंगालमधील एखाद्या जागेवरून नंदिता दासला पार्टीची उमेदवारी मिळू शकते, असे सांगितले जात आहे. कोंकणा सेन शर्मालाही पार्टीची उमेदवारी मिळू शकते.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अजून कोणाचेच नाव निश्चिमत झालेले नाही; पण सामान्य जनतेच्या संघर्षात सहभागी होणार्याद काही कलाकारांना पार्टीत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांची नावे आघाडीवर असून, त्यांना उमेदवारी मिळू शकते. याशिवाय आगामीकाळात कोणते बॉलीवूडचे हिरो निवडणूकीत उतरतात हे पाहणे औत्सुाक्यााचे ठरेल.

Leave a Comment