स्मार्टफोनच्या सहाय्याने करा लगेज ट्रॅक

विमानप्रवासात आपले लगेज दुसर्‍याच फ्लाईटवर चढविले गेल्यामुळे होणारा मनस्ताप अनेकांच्या परिचयाचा असेल. विमानप्रवासात महत्त्वाचे सामान असलेले लगेज दुसरीकडेच गेल्याचा अनुभव विमान प्रवाशांना नवा नसावा. अर्थात याचा त्रास फक्त प्रवाशालाच नाही तर संबंधित विमानकंपन्यांनाही होत असतोच. यावर उपाय म्हणून एअरबसने बॅग टू गो ही विशेष बॅग विकसित केली आहे. लगेज उत्पादक कंपनी आणि टेलिकॉम कंपनी टी सिस्टिम यांच्या सहकार्याने ही बॅग विकसित केली गेली आहे.

यात एका छोट्या सिम कार्ड तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. प्रवासी प्रवासासाठी निघेल तेव्हा त्याने आपले फ्लाईट डिटेल्स स्मार्टफोन अॅपवर भरावयाचे आहेत. मग हे अॅप हा डेटा सिमकार्डकडे पाठविते त्यामुळे बॅगेचा मालक आणि विमानकंपनी प्रवास संपेपर्यंत इलेक्ट्रोनिकली एकमेकांना कनेक्ट राहतात. अशावेळी समजा तुमची बॅग दुसर्‍याच विमानात चढविली जात असेल तर बॅगेचा मालक आणि विमानकंपनी दोघांनाही अॅलर्ट मेसेज येतो त्यामुळे बॅगेचे चुकीचे लोडिंग होण्यापासून सुटका होते.

Leave a Comment