बध्दकोष्ठावर साधा उपाय

बदलत्या जीवनशैलीने आणि तिच्यातील अनियमिततेने दिलेली एक देणगी म्हणजे बध्दकोष्ठ. ज्या लोकांना रोज शौचाला साङ्ग होत नाही. त्याला बध्दकोष्ठ म्हणतात. शेवटी आपल्या पचनसंस्थेचीसुध्दा एक सायकल असते. खाण्यापासून मल विसर्जनापर्यत तिच्यातल्या सार्‍या प्रक्रिया ठरलेल्या असतात आणि त्या विशिष्ट वेळेत पार पडल्या तर सार्‍या गोष्टी ठीक होतात. परंतु त्यातल्या वेळा पाळल्या गेल्या नाहीत तर पोट साङ्ग होत नाही. त्यामुळे तातडीने ङ्गार मोठी तक्रार होत नाही. परिणामी त्यावर कोणी चर्चा करत नाही. मात्र तिचे दीर्घकाळानंतर होणारे परिणाम घातक असतात. म्हणून त्याबाबत वेळीच काळजी घेतली पाहिजे. जेवणाच्या वेळा ठरलेल्या असणे ही सगळ्यात पहिली काळजी आहे.

परंतु याउपरही ही गोष्ट पाळली जातेच असे नाही. तेव्हा बध्दकोष्ठता वाढायला लागते. त्यावर सगळ्यात प्राथमिक आणि सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. दिवसातून किमान तीन लीटर पाणी पिले पाहिजे. भरपूर पाणी पिल्यामुळे आरोग्याचे इतरही अनेक ङ्गायदे होतात. त्यातच हाही एक ङ्गायदा असतो. पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी मात्र स्वच्छ आणि ङ्गिल्टर्ड असले पाहिजे. दुसरा उपाय म्हणजे आहारातल्या पदार्थांचा ज्याच्या आहारात तंतूमय पदार्थांचा समावेश अधिक असतो त्याची बध्दकोष्ठाची तक्रार कमी असते. तेव्हा खाण्यामध्ये भाज्या, ङ्गळे विशेषतः पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या पाहिजेत. आपण काय खाऊ नये हेही महत्त्वाचे असते.

बध्दकोष्ठाची तक्रार असणार्‍यांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. अशा लोकांच्या पोटामध्ये चरबी जेवढी कमी जाईल तेवढे शौचाला साङ्ग होईल. हा नियम केवळ दुग्धजन्य पदार्थापुरताच मर्यादित नाही. तर अन्यही चरबीयुक्त पदार्थ म्हणजे श्रीखंड, आईस्क्रिम हेही खाता कामा नये. शारीरिक हालचाली वाढविणे, रोज किमान तीन किलोमीटर चालणे हेही या त्रासावर उपाय म्हणून आवश्यक आहे. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळांचाही परिणाम बध्दकोष्ठावर होतो. पहाटे उठणार्‍यांना हा त्रास कमी असतो तर सूर्यवंशी लोकांना तो जास्त असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मनोवृत्ती. आनंदी, प्रसन्न, समाधानी माणसाला हा विकार कमी होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment