नोकिया ल्युमिया १५२० बाजारात दाखल

नवी दिल्ली – फिनलंडच्या नोकिया कंपनीने सरत्या वर्षातल्या शेवटच्या महिन्यात बाजारात ल्युमिया १५२० स्मार्टफोन कम फॅब्लेट सादर करून वर्षअखरीची बाजार संधी साधली आहे. भारतात लाँच केलेल्या या स्मार्टफोनची किमत ४६९९० रूपये आहे. सहा इंची फुल एचडी स्मार्टफोनला २० मेगापिक्सल कॅमेराही देण्यात आला आहे.

२ जीबी रॅम असलेल्या या फोनला विंडोज फोन ८ ऑपरेटिंग सिस्टीम असून लाल, पांढरा, काळा आणि पिवळा अशा रंगात तो उपलब्ध आहे. लाईव्ह टाईल्स मुळे स्टार्ट स्क्रीनवर हवे ते फोटो आणि हवे ते अॅपस युजरला टाकता येणार आहेत तसेच यात लाइव्ह म्युझिक रेकॉर्ड करण्याची सुविधाही दिली गेली आहे.