वय वर्षे साठ – अनोख्या मुहुर्तावर बांधली लग्नगाठ

लंडन – ब्रिटनमधील ६० वर्षीय फिलिप ब्रॅागटन आणि ४७ वर्षीय फिओना यांनी ११ डिसेंबर १३ ला लग्नगाठ बांधली यात नवल नाही. या वर्षात येणार्‍या या अनोख्या तारखेला म्हणजे ११-१२-१३ ला जगभरात अनेक लग्नगाठी बांधल्या गेल्या, अनेकांनी जन्म घेतले. मात्र फिलिप फिओनाने त्यात आणखी अनोख्या आकड्यांची भर घातली.

फिलिप आणि फिओना या दोघांनाही बॉलरूम डान्सची आवड. ही आवड जपतानाच दोघांचा परिचय झाला तो पाच वर्षांपूर्वी. मात्र एकमेकांना जोखण्यात चार वर्षे गेल्यानंतर त्यांनी गेल्या नाताळात साखरपुडा केला. लग्न करण्यासाठी ११-१२-१३चा मुहुर्तही ठरविला. पण मित्रांनी सुचवले की लग्नाची सही दुपारी २ वा.१५ मिनिटांनी करा. म्हणजे १४ वाजून १५ मिनिटांनी. या दोघांनी ते लगेच मान्य केले आणि बरोबर १४ वाजून १५ मिनिटांनी सह्या केल्या. यामुळे आता त्यांची तारीख झाली ११-१२-१३ आणि पुढे वेळ १४ -१५. म्हणजे ११ ते १५ पर्यंतचा सिक्ववेन्स त्यांनी पूर्ण केला आहे.

Leave a Comment