राज्यात थंडीचा कडाका कायम

पुणे – राज्यातील थंडीचा कडाका कायम असून, अहदनगर येथे ४.८ अंश से. इतकी सर्वात नीच्चाकी किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे अहमदनगर जिल्हा गारठला आहे. पुणे शहरात ७ अंश तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात थंडीची लाट राहील असा अंदज पुणे वेधशाळेने वर्तिवला आहे.

राज्यात थंडीचा कडका वाढल्याने मध्यमहाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, नाशिक तर विदर्भ- मराठवड्यातील नांदेड, परभणी, अमरावती, गोन्दिया चांगलेच गारठले आहे. गेल्या महिन्यात ‘लेहर’ चक्रीवादळामुळे गायबझालेली थंडी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या ‘मडी’ चक्रीवादामुळे थंडीचे पुर्नगामन झाले.

मात्र, त्यानंतर थंडीचा कडाका एवढा वाढला की, २० ते २१ अंशावर आलेले किमान तापमान गेल्या आठ िदवसांपासून ५ ते ६ अंशावर येऊन पोहचले आहे. त्यामुळे राज्यातील थंडीची लाट आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील किमान तापमानात ४.८ अंशावर आल्याने नगर जिल्हा चांगलाच गारठला आहे. यावर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

पुणे शहरातही थंडीचा कडाका कायम असून, किमान तापमान ७ अंशावर होते. येत्या दोन दिवसात शहरासह राज्यातील थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यत असून, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात थंडीची लाट राहील असा अंदज पुणे वेधशाळेने वर्तिवला आहे. तर शहरातील कमाल व किमान तापमान ३१ व ७ अंश से.च्याआसपास राहील. असे वेधशाळेने सानगतले.

गेल्या २४ तासांत काही प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश से.मध्ये) – अहमदनगर ४.८, नाशीक ६.५, पुणे ७, जळगाव ७.३, नांदेड ८.५, गोंदिया आणि अमरावती ९, सातारा आिण मालेगाव ९.२, परभणी ९.४, उस्मानाबाद ९.५, औरंगाबाद ९.६, यवतमाळ, अकोला १०, वर्धा१०.१, नागपूर, बिड बुलढाणा १०.२, सोलापूर १०.८, सांगली १२.१, ब्रह्मपुरी १२.३, वाशीम १२.४, चंद्रपूर १२.६, महाबळेश्वर १३.४.

Leave a Comment