तिरुअनंतपुरम- त्रावणकोरचे लोकप्रिय राजे आणि पद्मनाभस्वामी मंदिराचे परिरक्षक महाराजा उत्रदोम तिरुनल मार्तंड वर्मा यांचे प्रदीर्घ आजाराने आज (सोमवारी) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

उत्रदोम तिरुनल मार्तंड वर्मा हे त्रावणकोरचे शेवटचे राजे महाराजा चित्र तिरुनल रामा वर्मा यांचे धाकटे बंधू होत. रवि वर्मा कोचू कोइल तामपुरन आणि सेतू पार्वती बाई हे त्यांचे वडील आणि आई होत. उत्रदोम तिरुनल हे त्रावणकोरमधील लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. महाराजा यांच्यावर ६ डिसेंबरपासून येथील एसयूटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मोठ्या आतड्याचा रक्तस्त्राव आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.
वर्मा यांनी पद्मनाभस्वामी मंदिराचे परिरक्षक म्हणून जबाबदारी समर्थपणे सांभाळली. अलीकडे या मंदिराचा खजिना उघडण्यात आल्यानंतर एक लाख कोटी रुपयांहून अधिक संपत्ती येथे सापडल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा चर्चेचा विषय ठरला.