जवसाचे औषधी गुणधर्म

मराठी माणसांच्या खाण्यामधले कितीतरी पदार्थ आता कमी झाले आहेत. आपण सगळे पोळीभाजीलाच मराठी खाणे समजायला लागलो आहोत. खरे म्हणजे आपल्या मराठी माणसांच्या खाण्यातल्या नुसत्या चटण्यांची यादी केली तरी आपल्याला असे लक्षात येईल की त्यातल्या कितीतरी चटण्या खाण्यातून बाद झाल्या आहेत. नव्या पिढीला त्या चटण्यांची नावेसुध्दा माहीत नाहीत. परंतु त्या जोपर्यंत आपल्या खाण्यात होत्या तोपर्यंत त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे शरीराच्या गरजांचा समतोल आपोआप साधला जात होता. जवस, कारळ, पुडचटणी, मेतकूट इत्यादी गोष्टी आता ङ्गक्त कागदावरच शिल्लक राहिल्या आहेत.

जवसाचे औषधी गुणधर्म आश्‍चर्य वाटावे असे आहे. त्याचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ या नावाचे ङ्गॅटी ऍसिड असते असे दाखवून दिले. हे ङ्गॅटी ऍसिड डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ङ्गॅट आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक जवसात आहे आणि त्याच्यामध्ये ऍन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे. कर्करोगापासून सुटका करणारे ङ्गायबर जवसामध्ये विपुल असते. त्यामुळे जवसाला अनेक रोगांचा प्रतिबंध करणारे औषध मानले जायला लागले आहे.

त्याचा उपयोग खालील रोगावर होतो. टाईप – टू डायबेटीस असणार्‍या रुग्णांमध्ये जवसातील लिग्नन उपयुक्त ठरते. कारण हे लिग्नन ब्लड शुगरचा समतोल साधते. हृदयरुग्णांसाठीसुध्दा जवसातील काही गुणधर्म उपयोगी पडतात. जवस कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. कर्क रोग आणि अन्यही काही विकारांवर जवस उपयुक्त ठरते. जवसाची पूड चमचाभर घेऊन ती पाण्यात मिसळून सकाळी सकाळी प्राशन केली तर हे सारे गुणधर्म आपल्याला उपयुक्त ठरतात.

स्वयंपाक करताना खाद्यपदार्थांवर वरून जवसाची चमचाभर पूड पसरवली तरीही जवस आपल्या शरीरात जाऊन योग्य ती कामगिरी बजावतो. असे असले तरी अती तिथे माती हा नियम जवसालाही लागू आहे. जवसाचे खाण्याचे प्रमाण राखले गेले पाहिजे आणि ते मर्यादेतच ठेवले पाहिजे त्याचे अधिक प्राशन आरोग्याला घातक ठरू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment