कोट्यवधीची लॉटरी लागल्याचे एसएमएस बंद करा

पुणे – लाखो रुपयांची लॉटरी किंवा बक्षीस जिंकल्याचे एसएमएस आिण ई-मेल पाठवून सर्वसामान्यांना फसवणार्‍या टोळीला रोखण्यासाठी पुणे पोिलसांच्या सायबर क्राईम सेलने पाऊल उचलले आहे.

कोट्यधीश बनण्याचे आमिष दाखिवणारे एसएमएस बंद करण्यात यावे, असे पत्र सायबर क्राईम सेलने मोबाईल सेवा पुरिवणार्‍या कंपन्यांना दिले आहे.

लाखो रुपयांचे बक्षीस तुम्ही जिंकला, तुम्हाला एक कोटीची लॉटरी लागली, आकर्षक योजनेत गुंतवणूक करा आण घरबसल्या व्याज घ्या असे अमिष दाखविणारे एसएमएस, ई-मेल नागरिकांच्या मोबाईलवर येतात. मात्र, हे सर्वएसएमएस फसवे असून, यातून नागरिकांची फसवणूक होते.

सध्या या स्वरूपाचे गुन्हे वाढले असून, यामध्ये नायजेरियातीलएक टोळी सक्रिय आहे मात्र, गेल्या काही वर्षापासून आपल्या देशातील चोरट्यांनीही मजल मारली आहे.

सुरवातील लाखो किंवा कोट्यवधी रुपयांचे बक्षीस देण्याचे आमिष दाखिवणारे एसएमएस पाठवायचे. एखाद्या बँकेचा खाते क्रमांक पाठवून समोरील नागरिकांला त्या खात्यामध्ये पैसेभरावयास सांगायचे. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही बक्षिस न देता फसवणूक करण्याचे गुन्हे दिवसेंिदवस वाढत आहेत.

कमी वेळात अमाप पैसा कमिवण्याचा मार्गहे चोरटे मानतात. मात्र, अशा गुन्ह्यांचा छडा लावणे तेवढे सोपे काम नाही. कारण इंटरनेट सेवा पुरिवणार्‍या कंपन्यांचे सव्हर्र हे परदेशात असतात. त्यामुळे सायबर क्राईम सेलला या गुन्ह्याच्या तपासात सर्वप्रथम त्या कंपनीची मदत घ्यावी लागते.

सायबर क्राईम सेलचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिन्दे यांनी मोबाईल सेवा पुरिवणार्‍या प्रमुख चार कंपन्यांशी नुकताच पत्रव्यवहार केला असून, कोट्यावधी रूपयांचेअमिष दाखिवणारे बल्क एसएमएस तत्काळ बंद करावे अशी िवनंती त्यांनी पत्राद्वारे मोबाईल कंपन्यांना केली आहे.

Leave a Comment