कसोटीत चार वेगवान गोलंदाज खेळविणार-धोनी

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडिया अजूनही सावरली नाही. त्याचमुळे १८ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणार्याड पहिल्या कसोटीत कर्णधार महेंद्रसिंह धोनीची कसोटी लागणार आहे. त्यामुळेच धोनीने चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली आहे. झहीरसह ईशांत शर्मा, मोहंमद शमी, भुवनेश्वंर कुमार, उमेश यादव यांच्यापैकी चारजण कसोटी मालिकेत खेळतील असे वाटते.

काही दिवसांपूर्वी झालेल्यात वन-डे मालिकेत आर. आश्विदनला लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता. त्यामुळे धोनी चार वेगवान गोलंदाजांना संधी देईल, हे जवळपास निश्चिआत आहे. विदेशी भूमीवर टीम इंडियाकडुन तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूला खेळविले जाते. मात्र, जोहान्सबर्ग येथे होणार्याे कसोटीत हे चित्र बदलू शकते. भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या वन-डेत आफ्रिकेने पाच वेगवान गोलंदाजांना खेळवून भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखले होते.

दुस-या वन-डेतही भारतीय खेळाडू आफ्रिकेच्या वेगवान मा-यासमोर टिकू शकले नव्हते. तिसर्याौ वन-डेत भारताच्या ईशांत शर्मा आणि मोहंमद शमी यांनी अनुक्रमे चार आणि तीन बळी मिळवत आफ्रिकन फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन पहिल्या कसोटीत चार वेगवान गोलंदाजांना खेळविण्याचा विचार करू शकते. अनुभवी झहीर खान बर्यािच दिवसांनंतर संघात पुनरागमन करीत आहे. या अनुभवी खेळाडूच्या नावावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्थिम याला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल १३ वेळा बाद करण्याचा विक्रम आहे. आफ्रिका दौर्याषसाठी भारतीय संघात झहीरसह ईशांत शर्मा, मोहंमद शमी, भुवनेश्वगर कुमार, उमेश यादव या पाच वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. यापैकी चारजण पहिल्या कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळवू शकतात

Leave a Comment