
नॉमपे – बुद्धाचे अवशेष असलेला सोन्याचा कलश कंबोडियातील बौद्धमंदिरातून चोरीस गेला आहे. राजधानी नॉमपेपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या उदोंग येथील मंदिरातून ही चोरी झाली आहे. चोरीस गेलेल्या कलशात बुद्धाचा दात, केस आणि अस्थी होत्या असे समजते. या बरोबरच कांही छोट्या मूर्तीही चोरांना पळविल्या आहेत . उंदोग शहरातील एका डोंगरावर हे मंदिर असून बुद्ध जन्माला २५०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा साजर्या झालेल्या समारंभासाठी हे अवशेष श्रीलंकेतून आणले गेले होते.
